हापूस आंब्या पाठोपाठ आता चाकरमानी वाट पाहत असलेल्या फणसाच्या आगमनाला सुरूवात…
दर ऐकून फणसाची हाैस गरावर भागविणार
रत्नागिरी -हापूस आंब्या पाठोपाठ आता चाकरमानी वाट पाहत असलेल्या फणसाचे आगमन रत्नागिरीच्या बाजारपेठेमध्ये झाले आहे. कोकणातील गरीब शेतकऱ्यांचे उत्पन्नाचे एक साधन असलेले फणस बाजारात येऊ लागल्याने खवय्ये खुप खुष झाले आहेत.
पिका फणस किरकोळ पाचशे रूपये ते सातशे रूपये नग या दराने विक्रीला बाजारात उपलब्ध आहे. तर पिकलेला फणस फोडून त्याचा वाटा केवळ विस रूपये अश्या दराने विकला जात आहे. फणसाचे आगमन होताच अनेकांनी फणस विकत घेण्यासाठी धाव घेतली परंतु अख्खा फणस महाग असल्याने अनेक खवय्ये हिरमुसले व खरेदी न करता माघारी गेले. फणस परवडत नसल्याने अखेर काही खवय्यांनी नव करायच्या विचाराने पिकलेल्या फणसाचे वाटे विकत घेऊन घरी खाण्यासाठी नेण्यास पसंती दर्शवली.
काजुगराच्या भावाने बाजारात फणसाच्या गरांची विक्री झाली. अदयाप बाजरापेठेत म्हणावे तसे फणसाचे आगमन झालेले नाही. ग्रामीण भागात फणस (कुयऱ्या) छोटे असतानाच वानर, माकडे तोडून खावून नुकसान करतात त्यामुळे फणस होत नसल्याची कैफीयत शेतकऱ्यांनी हताशपणे सांगीतली.
www.konkantoday.com