
खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत रस्ते उखडले
खेड तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली होती. मात्र त्याची दुरूस्ती केल्यानंतरही अवघ्या एक महिन्यात रस्ते उखडले गेले असून ठेकेदाराच्या कामाच्या दर्जाबाबत उद्योजक आणि पंचक्रोशीतील नागरिक संतप्त सवाल करू लागले आहेत.लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधून राज्य तसेच केंद्र शासनाला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र येथील उद्योजकांना योग्य त्या भौतिक सुविधा पुरविण्यास शासन असमर्थ ठरत आहे, असे येथील रस्त्यांच्या दुरवस्थेवरून दिसून येत आहे.www.konkantoday.com