कुवारबांव रेल्वे स्टेशनसमोर नव्याने सुरू झालेल्या मोबाइल शॉप मध्ये चोरी ,भिंत फोडून प्रवेश करून सहा लाखांचा ऐवज लांबविला
रत्नागिरी रेल्वे स्टेशनसमोर कुवारबाव येथे नव्याने सुरू झालेल्या मँगो मोबाइल शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडून अंदाजे सहा लाखांचे मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली आहे नव्याने बांधलेल्या इमारतीत ही शॉपी काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती या इमारतीचे काम अपूर्ण असून त्याठिकाणी फक्त काही दुकाने सुरू झाली होती या इमारतीत कोणीही राहत नव्हते त्यामुळे रात्री तेथे अतिशय कमी वर्दळ होती याचा फायदा घेऊन चोरटय़ांनी मोबाइल शॉपीचे चक्क भिंतीला भगदाड पाडून आतमध्ये प्रवेश केला व आतील किमती मोबाइलचा ऐवज लांबवून नेला
www.konkantoday.com