
महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरूवात
महावितरण कंपनीने लॉकडाऊन काळातील थकीत वीज बिलांच्या वसुलीसाठी कठोर पावले उचलण्यास सुरूवात केली आहेत. येत्या दोन दिवसात थकीत वीज बिलांची रक्कम भरा अन्यथा वीज कनेक्शन तोडू असा इशारा कर्मचार्यांनी चिपळूण तालुक्यातील ग्रामीण भागासह शहसरात देण्यास सुरूवात केली आहे. महावितरणच्या या भूमिकेमुळे थकबाकीदार हैराण झाले असून अचानक एवढी रक्कम आणायची कुठून? अशा विवंचनेत ग्राहक पडले आहेत.
www.konkantoday.com