केंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं उचलणार
गेल्या काही दिवसांपासून देशातील कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात दररोज १४ हजारांहून अधिक कोरोना रुग्ण आढळून येऊ लागले आहेत. महाराष्ट्र, केरळ, छत्तीसगड, पंजाब आणि मध्य प्रदेशात पुन्हा कोरोनाचा कहर पाहायला मिळतो आहे. याची दखल घेत गृहमंत्री अमित शहांनी आरोग्य मंत्रालयाला कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्याच्या सूचना केल्या आहेत.
केंद्र सरकार आता ५० वर्षांवरील व्यक्तींचं लसीकरण करण्यासाठी पावलं टाकणार आहे. देशातील ५० वर्षांवरील व्यक्तींची संख्या २७ कोटींच्या घरात आहे.
www.konkantoday.com