सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात असल्याचा मनसे नेते संदीप देशपांडे यांचा आराेप
महाविकास आघाडी सरकारमधल्या अर्ध्याहून जास्त मंत्रिमंडळाला कोरोनाची लागण झाली आहे. यावरुनच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
अचानक मंत्री कोरोना पॉझिटिव्ह कसे येतात?, असा सवाल देशपांडे यांनी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री साहेबांना घरी थांबायचं आहे, म्हणून कोरोनाचे आकडे वाढून सांगता का?, असा प्रश्नही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारला आहे.सरकारला विधीमंडळाचं अधिवेशन चालवायचं नसल्यामुळे कोरोनाचे आकडे वाढवून सांगितले जात असल्याचा आरोपही देशपांडेंनी केला.
संदीप देशपांडे यांनी ट्विट करुन ठाकरे सरकारवर आरोप केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं की, सावधान! सध्या कोरोनाचा नवीन स्ट्रेन आला आहे. त्याचं नाव विधिमंडळ अधिवेशन कोरोना असं आहे. जो शरीरावर कमी, पण स्वातंत्र्यावर अधिक परिणाम करतो. अधिवेशनात सरकारला प्रश्नांची उत्तरं द्यायची नाहीत, विधानसभा अध्यक्ष निवडणूक लांबणीवर टाकायची आहे, म्हणून कोरोनाची भीती दाखवली जात आहे.
www.konkantoday.com