
आंबा मोसमातील गुहागर तालुक्यातुन पहिली आंबा पेटी वाशी मार्केटला रवाना
आंबा मोसमातील गुहागर तालुक्यातुन पहिली आंबा पेटी वाशी मार्केटला पाठवण्याचा मान तवसाळ गावातील युवा आंबा व्यवसायिक पंकज सुभाष सुर्वे यांनी पटकावला आहे. गुहागर तालुक्यातील खाडी पट्ट्यातील तवसाळ हे गाव आंबा व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. या गावातील प्रत्येक घरी आंबा व्यवसाय केला जातो. पंकज सुभाष सुर्वे यांनी आपल्या वडिलांच्या आंबा व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत मेहनत, तज्ञांचे मार्गदर्शन घेऊन आंब्याच्या झाडांची जोपासना केली त्या जोरावरच यावर्षी त्यांच्या बागेतील झाडांना लवकर मोहर आला.
www.konkantoday.com