
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण ,शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे भाजपचे नेते गिरीश महाजन यांची खडसेंवर खोचक टिप्पणी
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना पुन्हा एकदा कोरोनाची लागण झाली आहे. यावरुनच भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी खडसेंवर खोचक टिप्पणी केली आहे.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांना गेल्या दोन महिन्यात तीनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. हा कोरोनाचा कोणता प्रकार आहे, याची चौकशी करावी असे मी म्हणणार नाही. पण या कोरोनावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले पाहिजे असा टोला महाजनांनी लगावला.
www.konkantoday.com