
कित्येक वर्षे रखडलेल्या चारही कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू
दापोली (जि. रत्नागिरी) : गेली कित्येक वर्षे रखडलेल्या चारही कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू झाला आहे. याबाबतचे आदेश सकाळी जाहीर हाेताच कर्मचाऱ्यांनी आनंदाेत्सव साजरा केला. चार कृषी विद्यापीठांतील प्राध्यापकांना मात्र हा निर्णय लागू केलेला नाही.
कृषी विद्यापीठ संलग्न कृषी महाविद्यालय, कृषी विद्यालये व ग्रामीण शिक्षण संस्था वर्धा व अमरावतीतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुधारित वेतन संरचना लागू करण्याबाबतचा आदेश कृषी पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्य विभागाचे उपसचिव सु. स. धपाटे यांनी मंगळवारी जाहीर केला
www.konkantoday.com