भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी उद्योजक जनार्दन भोईर यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी केले

0
72

हौसेला मोल नसतं हेचं खरं.. भिवंडी तालुक्यातील वडपे या गावातील शेतकरी उद्योजक असलेल्या जनार्दन भोईर यांनी हौसेखातर चक्क हेलिकॉप्टर खरेदी केलं आहे. या हेलिकॉप्टरसाठी भोईर यांनी शेतातचं हॅलीपॅड उभारलं आहे. भोईर यांच्या या हेलिकॉप्टरची चर्चा आता जिल्ह्यात पसरली आहे.
भिवंडी तालुक्यात गोदाम व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या भागात आर्थिक प्रगती झाली आहे. अशातचं आता भिवंडी तालुक्यातील वडपे या गावात राहणारे मूळचे शेतकरी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय करणारे जनार्दन भोईर यांनी चक्क ३० कोटी रुपयांचे हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा निर्णय घेऊन सर्वांना अचंबित केलंय.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here