चिपळूण दाैर्यात आदित्य ठाकरे यांनी गाड्यांचा ताफा थांबवून केली शेतकऱ्यांची विचारपूस
पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे रामपूर येथून परत येत असताना त्यांनी तांबी गावातील रस्त्यावर आपले वाहन थांबवले. गाडीतून उतरून त्यांनी चक्क कलिंगड विक्रेत्यांची चौकशी केली. आदित्य ठाकरे यांना शिवसेनेचे ‘युवराज’ असे म्हटले जाते. पण, त्यांचा साधेपणा चिपळूणच्या दौर्यातील या कृतीतून दिसून आला. शेतकर्याने आनंदाच्या भरात ठाकरेंना कलिंगड आणि काकड्यांची भेट दिली.
शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त रामपूर येथे सुवर्णभास्कर नोकरी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन ठाकरे यांच्या हस्ते झाले.
नोकरी महोत्सवाचा उद्घाटन कार्यक्रम संपल्यानंतर ठाकरे आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूणातील घराकडे जाण्यासाठी रवाना झाले. पोलिस आणि कार्यकर्त्यांच्या वाहनांचा मोठा ताफा त्यांच्या वाहनाच्या मागे-पुढे होता. तांबी येथे आल्यानंतर आदित्य ठाकरेंची नजर रस्त्यावर बसलेल्या कलिंगड विक्रेत्याकडे गेली. त्यानी वाहन चालकाला गाडी थांबवण्याची सूचना केली. रस्त्यालगत ठाकरेंचे वाहन थांबले.त्यामुळे पोलिस आणि कार्यकर्त्यांची तारांबळ उडाली. गाडीतून उतरून ठाकरे तांबी गावातील कलिंगड विक्रेते रामचंद्र उदेग यांच्या जवळ गेले. तुम्ही हे कलिंगड कोठून आणलेत अशी विचारणा ठाकरेंनी उदेग यांना केली. त्यावर उदेग यांनी मी स्वतः कलिंगडचे पीक घेतल्याचे सांगितले. ठाकरेंनी उदेग यांच्याकडून कलिंगड व इतर शेती पिकाची माहिती करून घेतली. यातून मिळणारा नफा आणि लागणारी मेहनतही जाणून घेतली. उदेग यांनी कलिंगड आणि इतर पिकांची विस्तृत माहिती ठाकरेंना दिली.आमदार भास्कर जाधव यांनी कळंवडे व तांबी गावातील शेतकर्यांचे वैशिष्ट्ये ठाकरेंना सांगितले. ठाकरेंनी सामान्य शेतकर्याची विचारपूस केल्याबद्दल उदेग यांनाही आनंद झाला. त्यांनी एक कलिंगड आणि काकड्या ठाकरे यांना भेट म्हणून दिल्या. आदित्य ठाकरेंनी नम्रपूर्वक त्याचा स्वीकार करून साधेपणाची चुणूक दाखवून दिली.
www.konkantoday.com