
गुवाहाटीत काँग्रेस कार्यकर्ते अन् पोलिसांमध्ये झटापट
आसाममधील गुवाहाटी येथे काँग्रेस कार्यकर्ते आणि पोलीस समोरा-समोर आले होते. याप्रकरणी मुख्यमंत्री हिंमता बिस्व सरमा यांनी काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. जमावाला भडकवल्याचा आरोप हिंमता बिस्व सरमा यांनी राहुल गांधींवर केला आहे.
राहुल गांधींची ‘भारत जोडो न्याय यात्रा’ आसाममध्ये आहे. ही यात्रा गुवाहाटी शहरातून जाणार होती. पण, वाहतूक कोंडीच्या कारणास्तव यात्रेला शहरात प्रवेश करण्यास बंदी घालण्यात आली होती. तरीदेखील कार्यकर्ते जमा झाले आणि पोलिसांनी लावलेले बॅरिगेट्स तोडण्यात आले. पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज केला. यावेळी पोलीस आणि कार्यकर्ते समोरा-समोर आले.
यानंतर संबोधित करताना राहुल गांधींनी बॅरिगेट्स तोडलेल्या कार्यकर्त्यांना ‘बब्बर शेर’ असं म्हटलं. ‘आम्ही बॅरिगेट्स तोडले आहेत. पण, कायदा हातात घेणार नाही,’ असं राहुल गांधी म्हणाले.
www.konkantoday.com