
राणे यांच्या शिक्षणावरून निरर्थक वाचाळपणा करू नये-भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर
मनुष्य आपल्या कार्यकर्तृत्वाने आपली पत सिद्ध करतो. स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांना मुख्यमंत्री केले, ते त्यांचे शिक्षण बघून नव्हे, तर त्यांचे संघटनेतील योगदान, प्रशासनाचा गाढा अभ्यास बघून. खासदार विनायक राऊत व त्यांच्या समर्थक चेल्यांनी हे लक्षात घ्यावे. नारायण राणे यांच्या शिक्षणावरून निरर्थक वाचाळपणा करू नये, असा सज्जड इशारा भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांनी दिला आहे.
www.konkantoday.com