रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथे शेतात कृषी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या दाम्पत्याला मारहाण पंधरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
रत्नागिरी तालुक्यातील हरचेरी येथे शेतात कृषी सल्लागार म्हणून काम करणाऱ्या प्रणित पर्शुराम तारीत्यांच्या पत्नी या दाम्पत्याला शिवीगाळ व मारहाण करण्याचा प्रकार घडला याप्रकरणी १५ जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही घटना शुक्रवारी सकाळी घडली.
देवजी रोकडे, मनोहर तळेकर, अनिल तळेकर, सुनीता रोकडे, श्वेता तळेकर, रंजना तळेकर, सलोनी तळेकर, सुरेखा तळेकर, अस्मिता तळेकर, अंकेश तळेकर, शाम तळेकर, दत्ताराम तळेकर, विनोद तळेकर, नंदकुमार तळेकर,अशोक तळेकर(सर्व रा. हरचेरी तळेकरवाडी, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात प्रणित पर्शुराम तारी ( रा.लिंगायतवाडी, रत्नागिरी ) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, ते आणि त्यांची पत्नीहे हरचेरी येथील किरकिरे यांच्या शेतात कृषी सल्लागार म्हणून काम हाेते.त्या ठिकाणी संशयित आरोपी आले व त्यांनी काम बंद करण्यास सांगितले व त्यांना मारहाण केली
www.konkantoday.com