बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उच्चशिक्षित असलेली, अवघ्या २१ वर्षांची तरुणी गावाच्या विकासासाठी सरपंचपदावर विराजमान झाली

बीएस्सीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून उच्चशिक्षित असलेली, अवघ्या २१ वर्षांची तरुणी गावाच्या विकासासाठी सरपंचपदावर विराजमान झाली आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील निवेबुद्रुक येथील गावकर्‍यांनी उच्चशिक्षित कल्याणी जोशी हिच्या हाती गाव कारभाराची धुरा सोपवली आहे. संगमेश्‍वर तालुक्यात सर्वात कमी वयाची सदस्य म्हणून निवे बुद्रुक येथील कल्याणी ही बिनविरोध निवडून आली. गावच्या विकासाचा ध्यास घेऊन कल्याणीने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचा विचार पक्‍का केला होता.
उच्चशिक्षित असल्याने गावकर्‍यांनीही तिला लगेचच बिनविरोध निवडून देण्याचा निर्णय घेतला. गाव पॅनेलच्या माध्यमातून ती निवडून आली. त्याचबरोबर तिच्या हातात गावाचा कारभार देण्याचा निर्णयही घेतला. बुधवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी सरपंचपदाची माळ पडल्याने सर्वात तरूण वयात सरपंच होण्याचा मान कल्याणीने मिळवला आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button