खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी,महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनची मागणी
मुंबई, ठाणे, नवी मुंबई वगळता राज्यात इतर जिह्यांत पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. १५ फेब्रुवारीपासून विद्यापीठे व डिग्री कॉलेजही सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर खासगी कोचिंग क्लासेस सुरू करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कोचिंग क्लास ओनर्स असोसिएशनने केली आहे. असोसिएशनच्या शिष्टमंडळाने नुकतीच शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांची भेट घेतली. यावेळी क्लासचालकांनी विद्यार्थी आणि शिक्षकांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या ‘एसओपी’ सादर केल्या.
www.konkantoday.com