कष्टकरी लोकांच्या कोरोना लसीसाठी चिपळूण नगरपालिकेने अर्थसंकल्पात केली २५ लाखाची तरतूद
चिपळूण नगरपालिकेने चिपळूण शहरातील घराघरात काम करणार्या महिला, रिक्षाचालक व दुकानात काम करणारे कामगार यांना मोफत लस देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले असून यासाठी नुकत्याच झालेल्या नगरपरिषदेच्या अर्थसंकल्पात २५ लाखांची तरतूद केली आहे. शासनाने अद्याप कष्टकरी लोकांसाठी मोफत लस देण्याबद्दल निर्णय घेतलेला नाही. मात्र सामाजिक जाणीवेतून नगरपरिषदेने ही तरतूद केली असुन शासनाच्या पुढील धोरणाप्रमाणे याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
www.konkantoday.com