पिंपरी चिंचवडमधून गायब असलेले उद्योजक आनंद उनवणेंची हत्या,महाडच्या सावित्री नदी किनारी मृतदेह आढळला
पिंपरी चिंचवडमधून गायब असलेले उद्योजक आनंद उनवणेंची हत्या झाली आहे. त्यांचा मृतदेह महाडच्या सावित्री नदी किनारी आढळल्याने खळबळ उडाली आहे. या हत्येमुळं अनेक प्रश्न उपस्थित झालेत.
एफएफआय चिटफंड कंपनीचे मालक आनंद उनवणे ४ फेब्रुवारी पासून गायब होते. आणि आता थेट महाडमध्ये त्यांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
महाडच्या सावित्री नदीकडेला उनवणेचा मृतदेहच आढळला. ते नेमके इथं कसे पोहचले? त्यांची नेमकी हत्या कोणी केली? असे अनेक प्रश्न आता उपस्थित झालेत, याचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
www.konkantoday.com