नारायणराव राणे यांच्या हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय प्रकल्पामुळे कोकणात आरोग्यविषयक होणार क्रांती- माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी : सिंधुदुर्गात नारायण राणे यांनी मेडिकल कॉलेजची स्थापना केली आहे. त्याचे देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे, कोकणवासीयांसाठी हा खूप आनंदी क्षण आहे, कोकणात यामुळे आरोग्य विषयक खूप संधी, नर्सेस, डॉक्टर आणि रुग्णांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील, असे प्रतिपादन माजी आमदार आणि दि यश फाऊंडेशन कॉलेज ऑफ नर्सिंगचे व्यवस्थापकीय विश्वस्त बाळ माने यांनी केले.
नारायणराव राणे यांच्या हॉस्पिटल प्रकल्पाचे उद्घाटन अमितभाई शहा यांच्या हस्ते होत असल्याने कोकणातील भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
गेल्या काही वर्षात कोकणात आरोग्य सुविधा मिळण्यासाठी आणि वैद्यकीय शिक्षणासाठी महाविद्यालय, उत्तम रुग्णालयाची गरज होती. आज ही गरज राणे साहेबांमुळे पूर्ण होणार आहे.
कोकणात डॉक्टर टिकत नाहीत, सरकारी रुग्णालयात अल्प सुविधा यामुळे भक्कम वैद्यकीय व्यवस्था निर्माण करण्यासाठी या रुग्णालयाचे योगदान मोलाचे ठरणार आहे, असे प्रतिपादन बाळ माने यांनी केले.
www.konkantoday.com