
तळ्यात उडी मारण्याच्या प्रयत्नात झाडाची फांदी तुटून पडल्याने तरुण जखमी
तळ्यात उंचावरून उडी मारण्याच्या प्रयत्नात बाजूच्या झाडावर चढलेला तरुण झाडाची फांदी तुटल्याने खाली कोसळून गंभीर जखमी झाला. रत्नागिरी शहरातील तेलीआळी येथील तळ्यांमध्ये अनेक जण पोहोण्याचा आनंद घेण्यासाठी जातात असेच पोहोण्यासाठी गेलेल्या तरुणांपैकी एक जण उंचावरून तळ्यात उडी मारण्यासाठी बाजूच्या झाडावर चढला परंतु त्याचवेळी झाडाची फांदी तुटली आणि हा तरुण खाली कोसळला. कोसळल्यावर हा तरुण तळ्याच्या बाजूला असलेल्या दगडी बांधावर आपटला त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
www.konkantoday.com