
आता सिरम इन्स्टिट्यूट आणि युनिसेफमध्ये करार झाल्याने सिरम सुमारे १०० देशांना कोरोनाची लस पुरवणार
सिरम इन्स्टिट्यूट आणि युनिसेफने कोरोना लसीच्या दीर्घकालीन पुरवठ्यासाठी करार केला आहे. या करारानुसार सिरम १००देशांना 1.1 अब्ज कोरोना लसीचा पुरवठा करणार आहे. जगातील मोठ्या औषध निर्मात्या देशांपैकी हिंदुस्थान एक आहे. त्यामुळे अनेक देशांनी कोरोना लसीच्या पुरवठ्याबाबत हिंदुस्थानशी संपर्क साधला आहे. आता सिरम इन्स्टिट्यूट आणि युनिसेफमध्ये करार झाल्याने सिरम सुमारे १०० देशांना कोरोनाची लस पुरवणार आहे.
www.konkantoday.com