सिंधुदुर्ग जिल्ह्यात आजगांव वाघबीळ येथे डंपरने दुचाकीला धडक दिल्याने दाम्पत्याचा मृत्यू
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आजगाव वाघबीळ येथे काल रात्री डंपरने चार दुचाकींना धडक दिली. या विचित्र अपघातात एका दाम्पत्याचा मृत्यू झाला, तर आणखी तिघे गंभीर जखमी झाले आहेत. रात्री आठच्या दरम्यान घटना घडली.
रेडीहून मळेवाडच्या दिशेने जाणाऱ्या डंपर (एमएच ०७ सी ६३०६) ने चार दुचाकींना धडक दिली. अपघातात मधुकर रेवाडकर (वय ५२) आणि त्यांची पत्नी मधुमती रेवाडकर यांचा मृत्यू झाला. मधुमती यांचा जागीच मृत्यू झाला. मधुकर यांनाउपचारासाठी आणले असता मृत्यू झाला. आणखी तिघेजण गंभीर व दोघे किरकोळ जखमी झाले आहेत
www.konkantoday.com