
कोकणात प्रदूषणकारी प्रकल्प नकोच, शाश्वत कोकण परिषदेत मागणी
पालघर ते सिंधुदुर्गपर्यंत अनेक प्रदूषणकारी प्रकल्प असल्यामुळे कोकणचे फार मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे आता बस्स प्रदूषणकारी प्रकल्प कोकणात नकोच असा सूर येथे आयोजित शाश्वत कोकण परिषदेत निघाला. तसेच प्रत्येक औद्योगिक वसाहतीत स्थानिक प्रक्रिया उद्योग असलेच पाहिजेत अशी मागणीही करण्यात आली. उरलेसुरलेले कोकणचे सौंदर्य टिकवून ठेवायचे असेल तर प्रदूषणकारी प्रकल्प न आणता तरूणांना रोजगार देणारे, स्थानिक फळांपासून उत्पादन देणारे प्रकल्प आणण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याचे ठरवण्यात आले.नगर परिषदेच्या श्रावणशेठ दळी सभागृहात रविवारी शाश्वत कोकण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कोकणचे आतापर्यंत किती नुकसान झाले आहे. त्याचा लेखाजोखा मांडण्यात आला. मुंबईतील सत्यजित चव्हाण म्हणाले की, कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये अशा परिषदा घेवून त्यातून येणारी कोकणातील विकासाची भूमिका येत्या विधानसभा निवडणुकीत मांडावी असे मत व्यक्त केले.राजन इंदुलकर यांनी शाश्वत कोकण ही चळवळ संपूर्ण कोकणात पसरण्यासाठी एकत्रित काम करण्याची गरज आहे. फक्त मागण्या मागून काहीही होणार नाही. परिषदेला राम रेडीज, विलास महाडीक, सुधीर भोसले, धीरज वाटेकर, निखिल भोसले आदी उपस्थित होते. सूत्रसंचलन मल्हार इंदुलकर यांनी केले. www.konkantoday.com