बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही -दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे
BSNLआणि MTNL संदर्भात लोकसभेत प्रश्न विचारण्यात आला होता. त्याला दूरसंचार राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी लेखी उत्तर दिले. बीएसएनएल आणि एमटीएनएल बंद करण्याचा सरकारचा कोणताही विचार नाही, असे धोत्रे यांनी स्पष्ट केले. आर्थिक वर्ष २०१९-२० मध्ये बीएसएनएलच्या तोट्यात वाढ झाली असून, तो १५ हजार ५०० कोटी झाला आहे. तर एमटीएनएलला ३ हजार ८११ कोटींचा तोटा झाला आहे, अशी माहिती धोत्रे यांनी दिली.
www.konkantoday.com