
गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार
गवत फवारणीच्या औषधावरून झालेल्या वादातून एका वृध्दावर कोयतीने वार केल्याची घटना शनिवारी १० जुलै रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास संगमेश्वर तालुक्यातील मुर्शी – रेणुसेवाडी येथे घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात देवरूख पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवरूख पोलीस स्थानकातून दिलेल्या माहितीनुसार, याबाबत राजाराम संभाजी शेलार (६५) यांनी फिर्याद दिली आहे. विठ्ठल रेणुसे, महेश रेणुसे व मालती रेणुसे अशी गुन्हा दाखल केलेल्या तिघांची नावे आहेत. राजाराम शेलार हे शनिवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास शेतामध्ये गवत फवारणीचे औषध मारण्यासाठी गेले होते. यावेळी महेश रेणुसे व मालती रेणुसे गवत फवारणीच्या औषधाचा आम्हाला त्रास होतो हे सांगण्यासाठी गेले होते.यावरून वादावादी होऊन त्यामध्ये हा प्रकार घडला
www.konkantoday.com