दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा मिळणार
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून (एमएससीईआरटी) दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन सेवा मिळणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये व त्यांच्या समस्यांचे निराकरण व्हावे यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे. त्यासाठी राज्यभरातून तब्बल ४२६ तज्ञ समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
www.konkantoday.com