
कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये अधिभार ,वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नाही
कृषी क्षेत्रात पायाभूत सुविधा आणि विकास करण्यासाठी केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलवरील अधिभार वाढवण्याची घोषणा केली आहे. केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करताना याची घोषणा केली. पेट्रोलवर अडीच रुपये, तर डिझेलवर चार रुपये अधिभार आकारला जाणार आहे. या वाढीचा ग्राहकांवर परिणाम होणार नसल्याचंही सरकारनं स्पष्ट केलं आहे.
शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यावर जोर देत असतानाच केंद्र सरकारने कृषी क्षेत्राच्या पायाभूत विकासासाठी पेट्रोल-डिझेलवर अधिभार लावण्याची तरतूद केली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी याची घोषणा केली. पेट्रोलवर २.५ रुपये आणि डिझेलवर ४ रुपये कृषी पायाभूत सुविधा आणि विकासासाठी लावण्याचा प्रस्ताव ठेवत असल्याचं कृषी अर्थमंत्र्यांनी सांगितलं.
www.konkantoday.com