
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार द्या- भाजपच्या शिष्टमंडळाची मागणी
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपाचाच उमेदवार द्या अशी आग्रही मागणी भाजपा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा प्रमुख माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली,भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर, जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या शिष्टमंडळाने पक्षश्रेष्ठींकडे केली.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नारायण राणे , प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आमदार आशिष शेलार यांची भाजपा शिष्टमंडळाने तातडीची भेट घेतली. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे मतदार वाढले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपा शिंदे शिवसेनेपेक्षा कैक पटीने प्रबळ असून रत्नागिरी जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात भाजपाने बुथनिहाय कार्यकर्त्यांचे जाळे विणले असून भाजपाची ताकद वाढवली आहे. भाजपाच्या विचारसरणीवर चालणारा आणि पक्षाची ध्येयधोरणे पाळणारा उमेदवार असावा अशी आग्रही मागणी करत भाजपाचाच उमेदवारी द्यावी असा आग्रह करण्यात आला.www.konkantoday.com