रत्नागिरी करांनो फक्त एक महिना त्रास सहन करा, त्यानंतर शहरातील रस्ते होणार चकाचक
रत्नागिरी शहरातील गॅस पाईपलाईन व विस्तारित नळपाणी योजनेमुळे सध्या शहरातील अनेक भागातील रस्ते खोदण्यात आले आहेत मात्र रत्नागिरीचे नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी नागरिकांना दिलासा देणारी बातमी दिली आहे काल झालेल्या रत्नागिरी नगर परिषदेच्या सर्वसाधारण सभेत बोलताना नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी शहरात सुरू असलेल्या पाइपलाइनच्या कामामुळे शहरातील रस्त्यांची दुरावस्था झाली आहे हे मान्य केले नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो ही वस्तुस्थिती आहे नागरिकांनी एक महिना त्रास सोसावा रस्त्याच्या डागडुजीसाठी साठी पाच कोटीचा निधी उपलब्ध आहे खोदाईचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्वीप्रमाणे रस्ते चकाचक केले जातील अशी ग्वाही नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी सभागृहात दिली
www.konkantoday.com