खेड तालुक्यातील ऐनवली परिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात वासरू ठार
खेड तालुक्यातील ऐनवली परिसरात मुक्त संचार करणाऱ्या बिबट्याने केलेल्या हल्ल्यात तीन वर्षांचा वासरू ठार झाला. हा वासरू ऐनवली वरची वाडी येथील शेतकऱ्याचा होता. ही घटना २५ जानेवारी रोजी उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात बिबटयाचा वावर असल्याचे उघड झाले असल्याने नागरिकांमध्ये घरातीचे वातावरण आहे. पाळीव जनावरांवर हल्ला करणारा हा बिबट्या शेतात कामासाठी जाणाऱ्या माणसांवर हल्ला करण्याची शक्यता असल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे
बिबटयाच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वासराची भरपाई संबंधित शेकऱ्याला मिळावी अशी मागणी कुडोशीचे माजी सरपंच रवींद्र आंब्रे तसेच ऐनवली येथील ग्रामस्थांनी केली आहे
www.konkantoday.com