
रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलांची २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार
_रत्नागिरी शहरातील राजीवडा येथे जादा पैसे देण्याचे आमिष दाखवून महिलांची २९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. हानिफा साजिद मिरकर (३५, रा. राजीवडा, रत्नागिरी) यांनी या प्रकरणी शहर पोलिसांत तक्रार दाखल केली. यामध्ये ३१ महिलांची फसवणूक झाल्याचे मिरकर यांनी तक्रारीत नमूद केले आहे. पोलिसांनी या प्रकरणी दोघांविरूद्ध गुन्हा दाखल केला.फरहत इम्रान वस्ता व इम्रान यासीन वस्ता (रा. राजीवडा रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फरहत व इम्रान वस्ता यांनी राजीवडा येथे तक्रारदार यांच्यासह महिलांचे गट तयार केले. तसेच या महिलांना वेगवेगळ्या फायनान्स कंपनीत नेवून त्यांच्या नावे कर्ज काढून दिले होते. दरम्यान संशयितांनी आपल्या मुलीच्या लग्नासाठी व पुणे येथे कोर्टात सुरू असलेल्या केससाठी पैशाची गरज असल्याचे या महिलांना सांगितले. तसेच या महिलांना जेवढे पैसे घेतले त्यापेक्षा जास्तीचे पैसे देण्याचे आमिष संशयितांनी दाखवल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रत्यक्षात त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक करण्यात आली आहेwww.konkantoday.com