रत्नागिरी नगर परिषद क्षेत्रातील रस्ते बनले वाहतुकीला धोकादायक

0
33

रत्नागिरी नगरपरिषद क्षेत्राच्या सर्वच प्रभागातील रस्ते अधिक धोकादायक बनले आहेत. खोदाई पूर्ण झालेल्या रस्त्यांच्या देखभाल दुरूस्तीकडे पालिकेतील सत्ताधार्‍यांनी दुर्लक्ष केल्याने अपघातांना आयतेच निमंत्रण मिळत आहे.
विस्तारीत नळपाणी पुरवठा योजनेची जलवाहिनी, गॅस पुरवठा, महावितरणची अंडरग्राऊंड विद्युतवाहिनी या तिन्ही कामांसाठी पालिका क्षेत्रातील सर्वच रस्त्यांची टप्प्याटप्प्याने खोदाई केली जात आहे. ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या खोदाईकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने त्यांचा मनमानी कारभार अद्यापही सुरू आहे. ठेकेदाराच्या अनागोंदी कारभाराकडे पालिकेतील सत्ताधार्‍यांसह प्रशासनाचे प्रमुख असलेल्या मुख्याधिकार्‍यांनी दुर्लक्ष केले आहे. एका बाजूला माती, दगडांचा ढीग तर दुसर्‍या बाजूला खड्डेमय रस्ता अशी सध्याची परिस्थिती आहे.अनेक दिवस उलटूनही रस्त्याची अवस्था कायम आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here