
भारतीय जनता पार्टी आयोजित पतंग महोत्सव उत्साहात संपन्न.
रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीच्या वतीने मंगळवार आठवडा बाजार नाचणे रोड रत्नागिरी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ओबीसी महिला अध्यक्ष प्राजक्ता रुमडे, शहर चिटणीस ॲड. निलेश आखाडे प्रवीण मुंडे यांनी पतंग महोत्सवाचे आयोजन केले होते. या महोत्सवामध्ये सुमारे 50 पेक्षा अधिक लोकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला महोत्सवाचे औचित्य साधून पतंग प्रेमींनी मोठी गर्दी केलेली पाहायला मिळाली. मोठा लाल रंगाचा कापडी पतंग व एकाच धाग्यात सुमारे दहा ते बारा पतंग एक साथ उडवले गेले हे दोन्ही पतंग आकर्षणाचे केंद्र ठरले तर सर्वाधिक उंच पतंग कोणाचा जाणार यावर आकर्षक अशा ट्रॉफी व रोख रक्कम बक्षीस म्हणून ठेवण्यात आली होती. बाळा गावडे आणि संजना गावडे यांच्या सौजन्याने बक्षिसे देण्यात आली यामध्ये अनुक्रमे
स्वराली मानकर प्रथम क्रमांक,
रूद्र नंदकिशोर चव्हाण द्वितीय क्रमांक, हितेश कल्याणकर तृतीय क्रमांक, श्वेता बेंद्रे व यश सुर्वे. यांनी उत्तेजनार्थ तर सिद्धि मानकर यांना फॅन्सी पतंगासाठी त्यांना बक्षिसे देऊन गौरविण्यात आले. यावेळी भारतीय जनता पक्षाचे राजन फाळके, महेंद्र मयेकर, सचिन करमरकर, संदीप सुर्वे, राजन पटवर्धन, मुन्ना चवंडे, बिपिन शिवलकर, राजश्री शिवलकर, शिल्पा मराठे, स्नेहल पावरी, राधा हेळेकर, नंदू चव्हाण, तनया शिवलकर, मनोज पाटणकर, आदी उपस्थित होते.
www.konkantoday.com