महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे सर्वाचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही लवकरच ते भेटी देतील-पालकमंत्री अनिल परब

0
37

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून उध्दव ठाकरे हे सर्वाचीच बाजू ऐकून घेतील. नाणार रिफायनरी समर्थकांनाही लवकच ते भेटी देतील. भेटीची प्रक्रिया सुरु आहे. त्यांना लवकरच कळवले जाईल, असे प्रतिपादन राज्याचे परिवहनमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यानी आपल्या राजापूर भेटी दरम्यान केले. मंगळवारी रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर फेडरेशन अॉफ असोसिएशन्स फॉर रत्नागिरी डेव्हलपमेंट (फार्ड)च्या वतीने मुख्यमंत्र्याची भेट मिळावी, म्हणून उपोषण करण्यात आले.राजापूर दौऱ्यावर आलेल्या मंत्री अनिल परब यांना पत्रकारांनी ‘मुख्यमंत्री समर्थकांची बाजू ऐकून घेणार आहेत का ?’ असा प्रश्न विचारला. नाणार प्रश्नी जो काय निर्णय घ्यायचा आहे तो शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हेच घेतील. प्रकल्प समर्थकांनी त्यांच्याकडे पत्रव्यवहार केलेला आहे. त्यावर प्रक्रिया सुरु असून मुख्यमंत्री म्हणून ते त्यांची बाजू नक्कीच ऐकून घेतील, असे मंत्री परब यांनी स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here