दापोलीची महती सांगणारे गीत सादर हाेणार, तालुक्यातील सुमारे ३५ हून अधिक गायक, कलाकार या गाण्याला आवाज देणार
सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरा असलेल्या दापोली तालुक्याची महती सांगणाऱ्या ठसकेबाज गाण्याचे रेकॉर्डिंग आणि शूटिंग होणार आहे. या गाण्याने लवकरच दापोली दणाणणार आहे. ‘वाट घमघम वळणाचा रस्ता… कोलीम भाकरीचा रस्सा …. बंदरावर शेल्फी काढतीया मांदेली ….’ या गाण्यावर दापोलीकर थिरकताना दिसणार आहेत.
प्रसिद्ध संगीतकार हरिश चव्हाण यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताचे शब्द कोकणातील प्रसिद्ध कवी प्रा. कैलास गांधी यांचे असून, तालुक्यातील सुमारे ३५ हून अधिक गायक, कलाकार या गाण्यात सहभागी होणार आहेत. या गाण्यासाठी लवकरच गायकांची तसेच कलाकारांची ऑडिशन टेस्ट घेण्यात येणार आहे.
त्याचे चित्रिकरण दापोलीतील विविध ठिकाणी होणार असून लोकप्रतिनिधींपासून सर्वसामान्य दापोलीकर आपल्या दापोलीची ओळख या गीताद्वारे जगासमोर आणणार आहेत.
www.konkantoday.com