वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेशा विराेधात विरोधक आक्रमक

राज्यात लॉकडाऊन काळात अव्वाच्या सव्वा वीजबिल आकारल्यामुळे जनतेत आक्रोश आणि विरोधकांनीही यावरुन सरकारला धारेवर धरलेलं असतानाच आता ‘महावितरण’ने थकीत वीजबिल वसुलीचे आदेश जाहीर केले आहेत. राज्यात वीजबिल वसुलीची मोहीम राबवून थकबाकी वसुल करण्याचे व थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा त्वरित खंडीत करण्याचे आदेश ‘महावितरण’ने सर्व क्षेत्रिय कार्यालयास दिले आहेत.त्यामुळे, विरोधक आक्रमक झाले असून मनसेनंतर आता भाजपानेही महाविकास आघाडी सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लक्ष्य केलंय. वीज कनेक्शन खंडीत करण्याचा निर्णय म्हणजे सरकारची नवी गाथा असल्याचं भाजपाचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button