खेड रेल्वे स्थानक परिसरात आज पुन्हा एक मृत कावळा निदर्शनास आल्यामुळे प्रशासन सतर्क
खेड: रेल्वे स्थानक परिसरात आज पुन्हा एक मृत कावळा निदर्शनास आल्यामुळे प्रशासन सतर्क झाले आहे. शहरानजीक असलेल्या वेरळ गावात सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेल्या काही लोकांना हा मृत कावळा निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याबाबत प्रशासनाला ही माहिती दिली.
तीन दिवसांपूर्वी देखील खेड मध्ये अशाच प्रकारे एक मृत कावळा चाटव गावात आढळला होता.
तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी प्राथमिक तपासणी करून मृत पक्षी शवविच्छेदनासाठी पुणे इथे पाठवले आहे. मात्र त्याचा अहवाल प्राप्त होण्यापूर्वीच वेरळ येथील रेल्वे स्थानक परिसरात अचानक आणखी तीन कावळे मृतावस्थेत सापडल्याने खळबळ उडाली आहे. याही कावळ्यांची प्राथमिक तपासणी झाल्यानंतरच त्यांच्या आकस्मिक मृत्यूचे नेमके कारण कळणार आहे. तोपर्यंत अशा मृतावस्थेतील पक्षांना कोणीही हात न लावणे व संबंधित प्रशासनाला कळवण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी यांनी केले आहे.
राज्यात बर्ड फ्लूचा वाढता धोका वर्तविण्यात येत असतानाच खेड तालुक्यात मृत कावळे आढळून आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. दरम्यान दरम्यान, शहरातील आजूबाजूच्या परिसरात अजून काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत का याचा शोध पक्षिप्रेमी घेत आहेत. शहर परिसरात कावळे मृत्युमुखी पडल्यामुळे शहरातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. पशुसंवर्धन विभाग योग्य ती खबरदारी घेईल. कुठेही पक्षी मृत्युमुखी पडल्याचे आढळल्यास त्याची विल्हेवाट न लावता पशुसंवर्धन कार्यालयात संपर्क साधावा अशी माहिती डॉ.विनया जंगले यांनी केले आहे.
www.konkantoday.com