रत्नागिरी तालुक्यातील मजगाव आंबेकोंडवाडी येथे शेतात लावलेल्या फासकीमध्ये बिबट्या अडकला.
रत्नागिरी तालुक्यातील मजगाव आंबेकोंडवाडी येथे शेतात लावलेल्या फासकीमध्ये बिबट्या अडकला. वनविभागाच्या पथकाने फासकी तोडून बिबट्याला जेरबंद केले. ही घटना काल दुपारी घडली.
मजगाव येथील वासुदेव दत्तात्रय अभ्यंकर यांच्या शेतामध्ये फासकीत बिबट्या अडकल्याचे आढळून येताच रत्नागिरीच्या वनरक्षकांना फोन करुन माहिती देण्यात आली. त्यानंतर वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचले. मादी जातीचा दहा वर्षे वयाचा हा बिबट्या होता़. वनविभागाने फासकीत अडकलेल्या बिबट्याची सुटका केली.
www.konkantoday.com