दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेर आराखडा होणार

0
34

रत्नागिरी शहराच्या विस्तारीकरणाचा भविष्यातील ३० वर्षांचा विचार करून उभारल्या जाणाऱ्या दांडेआडोम येथील घनकचरा प्रकल्पाचा फेर आराखडा करावा लागणार आहे; मात्र एकत्रित मैला प्रकल्प, प्लास्टिक प्रकल्प, बायोगॅस प्रकल्प होणार असल्याने पालिकेने फेर आराखडा करण्याचा निर्णय घेतला आहे पहिला आराखडा सुमारे १५ कोटी रुपयांच्या घनकचरा प्रकल्पाचा होता.
शहराजवळील दांडेआडोम येथे सुमारे १५ कोटींचा अत्याधुनिक घनकचरा प्रकल्प उभारण्यात येणार होता. सुमारे अडीच हेक्‍टर जागेवर हा प्रकल्प असून कचऱ्यावर १०० टक्के प्रक्रिया होणार आहे. यावर बायोगॅस प्रकल्प, वीज प्रकल्प, खत प्रकल्प उभारले जाणार आहेत.
www.konkantoday.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here