कॉंग्रेसला जिल्ह्यात पुन्हा सोन्याचे दिवस येतील -खा. हुसेन दलवाई
रत्नागिरी जिल्ह्यातल्या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रदेश कॉंग्रेसचे उपाध्यक्ष खासदार हुसेन दलवाई यांनी नुकताच जिल्हा संपर्क दौरा केला हाेता. चिपळूण तालुक्यातील त्यांनी कार्यकर्त्यांना कॉंग्रेस मजबूत करण्यासाठी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सज्ज होण्याचे आदेश दिले. तसेच कॉंग्रेसला जिल्ह्यात पुन्हा सोन्याचे दिवस येतील असा विश्वास खा. हुसेन दलवाई यांनी व्यक्त केला. या प्रकरणी चिपळूण नगरपालिकेत कॉंग्रेसच्या नगरसेवकांच्या कामाचे त्यांनी विशेष कौतूक केले.
www.konkantoday.com