परदेशात हापूसची निर्यात करताना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करावे आंबा उत्पादकांची सुरेश प्रभूंकडे मागणी
परदेशात हापूसची निर्यात करताना येणार्या अडचणी सोडविण्यासाठी केंद्र शासनाने सहकार्य करावे अशी मागणी रत्नागिरी जिल्ह्यातील आंबा उत्पादक शेतकर्यांनी चार दिवसांपूर्वी रत्नागिरी दौर्यावर आलेल्या माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे केली.
अपेडा, पणन, नाबार्डचे अधिकारी यांच्या माध्यमातून हे प्रश्न सोडविले जातील, असे प्रभू यांनी यावेळी सांगितले. रत्नागिरी दौर्यावर आले असता सुरेश प्रभू यांची आंबा उत्पादकांनी भेट घेतली.
यावेळी जिल्हा आंबा उत्पादक संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सावंत, प्रसन्न पेठे, रजनीश महागावकर उपस्थित होते.
www.konkantoday.com