
ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर
कोकण मराठी साहित्य परिषदेचे संस्थापक ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांना कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा यंदाचा मराठीतील मानाचा जनस्थान पुरस्कार जाहीर झाला आहे. सोमवारी नाशिकमध्ये प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे, उपाध्यक्ष वास्तुविशारद संजय पाटील स्मारक समितीचे अॅड. विलास लोणारी यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली.मराठी साहित्य क्षेत्रात विशेष कामगिरी करणार्याय आणि महाराष्ट्राच्या जीवनावर ठसा उमटविणार्याच साहित्यिकाला कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे हा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते. एक वर्षाआड हा पुरस्कार दिला जातो. एक लाख रूपये रोख, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यापूर्वी विजया राजाध्यक्ष, अरुण साधू, भालचंद्र नेमाडे, इंदिरा संत, विजय तेंडुलकर अशा दिग्गजांना या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
www.konkantoday.com