
कोकण रोजगार हक्क महाआंदोलनासंदर्भात उद्या महत्त्वाची बैठक
रत्नागिरी : प्रतिनिधी
कोकणाच्या मूलभूत प्रश्नांवर होणाºया पहिल्या कोकण रोजगार हक्क महाआंदोलन आणि विकास यात्रेच्या पार्श्वभूमीवर उद्या शुक्रवार दि. १४ जुनरोजी शहरातील हॉटेल व्यंकटेश येथे आढावा आणि पूर्वतयारी बैठक होणार आहे.
रोजगार हीच मूळ समस्या असेल्या कोकणत डॉलर मिळवून देणारे पर्यटन, मत्स्य उदयोग, हापूस, काजु यांचे नीट नियोजन केले तर गावागावात लाखो रोजगार निर्माण करता येतील. याकरिता प्रशिक्षण, या उद्योगांना पूरक धोरणे, प्रोत्साहन देणाºया योजना व पायाभूत सुविधा यांची गरज आहे. यासाठी कोकणातील पर्यटन आणि मत्स्य व हापूस उद्योगासाठी फक्त १० वर्ष निधी उपलब्ध करुन दिला पाहिजे व उदयोग पूरक धोरणे हवीत हाच आग्रह धरण्यासाठी एक रचनात्मक संघर्ष करण्यात येणार आहे. समृद्ध कोकण संघटनेने हे आंदोलन आयोजित केले आहे. तारकर्ली मालवण, रत्नागिरी, श्रीवर्धन, पालघर आणि आझाद मैदान मुंबई संपुर्ण कोकणात कोकण रोजगार हक्क परिषदा आयोजित करण्यात येणार आहेत. यावेळी कोकणाची बाजू आगामी पावसाळी अधिवेशनात मांडण्यासाठी १७ जुनपासून कोकणातील जिल्हास्तरीय आंदोलने सुरू होणार असून त्यानंतर २५ जूनरोजी सकाळी १० ते रात्री ८ यावेळेमध्ये मुंबईतील आझाद मैदानावरत कोकणातील सर्व जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील आंदोलन एकत्र येऊन आपली भूमिका शासनासमोर मांडणार आहेत. रत्नागिरीमध्ये या आंदोलनाचे बिगुल वाजणार असून १७ जुनरोजी दुपारी २ वाजता हातखंबा ते जिल्हाधिकारी कार्यालय अशी कोकण विकास यात्रा काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी ४ वाजता शहरातील मराठा मैदान येथे रत्नागिरी रोजगार हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.
याचे नियोजन सुरू झाले असून विविध क्षेत्रातील भूमिपुत्रांना विविध लोकांना त्यांना या आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. १७ जुनच्या या आंदोलनाची पूर्वतयारी आणि आत्तापर्यंत केलेल्या कामाचा आढावा घेण्यासाठी उद्या शुक्रवार दि. १४ जुनरोजी शहरातील हॉटेल व्यंकटेश येथे संध्याकाळी ४ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. यावेळी ज्यांना या आंदोलनामध्ये सह•ाागी होऊन कोकण विकासासाठी सक्रीय व्हायचे आहे आणि जे सक्रीय झाले आहेत अशा सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन समृध्द कोकण संघटनेचे रत्नागिरी कार्याध्यक्ष कौस्तुभ सावंत यांनी केले आहे.