मानेज इंटरनॅशनल स्कूलला ब्रिटिश कौन्सिलचे प्रमाणपत्र

रत्नागिरी:-कुवारबाव येथील मानेज इंटरनॅशनल स्कूल या सीबीएसई बोर्डाच्या शाळेला युकेमधील ब्रिटिश कौन्सिल या प्रतिष्ठित संस्थेकडून फाऊंडेशन प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे. इंटरनॅशनल स्कूल अवॉर्ड या उपक्रमांतर्गत शाळेने आंतरराष्ट्रीय परिमाणासाठी राबिवलेल्या उपक्रमांमुळे हा सन्मान मिळाला आहे.
या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी कठोर निकषांचे पालन केले जाते. यामुळे शिक्षकांनी कोल्हापूर, पुणे व मुंबई येथे प्रकल्पाचे प्रशिक्षण घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी नैसर्गिक आपत्ती व पशुधन या विषयांवर जागतिक परिमाणातून अभ्यास केला.
मागील संपूर्ण वर्षभरात या विषयांवर व्याख्याने, प्रदर्शन, पीपीटी सादरीकरण असे विविध उपक्रम आयोजिण्यात आले. आयएसए विभागप्रमुख मुनझ्झा मिरकर, ओवी बंडबे, संजीव डोंगरे, प्रियांका सुर्वे, आरती मुळ्ये, स्वराली दळी आणि सिद्धिता देवरुखकर यांनी प्रकल्पाच्या यशस्वितेसाठी काम केले. त्यांना अन्य विषय शिक्षकांचीही मदत झाली. मुख्याध्यापक उल्हास सप्रे यांनी समन्वयक आणि व्यवस्थापक प्रद्युम्न माने यांनी मार्गदर्शक म्हणून भूमिका बजावली.
संस्थेचे उपाध्यक्ष मनोहर सुर्वे आणि विश्वस्त जान्हवी माने यांनी या संघाचे अभिनंदन केले.प्रबोधन शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष व माजी राज्यमंत्री रवींद्र माने यांनी राज्यातील निवडक शाळांमध्ये समावेश झाल्याबद्दल समाधान व्यक्त केले. त्यांनी व कार्यकारी अध्यक्षा नेहा माने यांनी सर्व संबंधितांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button