
खासदार मा.सुरेशजी प्रभु यांची स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट
माजी केंद्रीय मंत्री खासदार मा.सुरेशजी प्रभु यांनी आपल्या रत्नागिरी दौ-याचे दरम्यान स्वामी स्वरुपानंद पतसंस्थेला सदिच्छा भेट दिली.
खासदार मा.सुरेशजी प्रभु यांचा शाल, श्रीफळ व स्वामी स्वरुपानंदांची प्रतिमा देवून अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी सत्कार केला त्याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.माधव गोगटे, संचालक श्री.प्रसाद जोशी तसेच श्री.राजीव कीर, श्री.सचिन करमरकर, श्री.विजयराव देसाई, श्री.राजेंद्र फाळके हे उपस्थित होते.
यावेळी त्यांनी संस्थेची माहिती घेतली. मा.प्रभू साहेब हे अर्थतज्ञ असल्याने संस्थेच्या आर्थिक पत्रकांविषयी त्यांना संस्थेचे अध्यक्ष अॅड.दीपक पटवर्धन यांनी अवगत केले. कोव्हीड काळातही संस्थेचे आर्थिक व्यवहारातील झालेली वाढ पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
www.konkantoday.com