
वैमनस्य, समाजकंटक आदींमार्फत संगमेश्वर तालुक्यात जाणुनबुजून वणवे लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले
वणवामुक्त कोकणची संकल्पना प्रत्यक्षात साकारण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून त्यासाठी जिल्हा स्तरावर स्वतंत्र समितीची स्थापना करण्यात आली आहे. सदर संकल्पनेची प्रत्यक्षात कधी अंमलबजावणी होणार याकडे संगमेश्वर तालुक्यातील ग्रामस्थ, बागायतदार, शेतकर्यांचे लक्ष लागले आहे.
संगमेश्वर तालुक्यात नैसर्गिक जंगलासह गवताचे क्षेत्र सर्वाधिक आहे. अनेकांच्या चुकीमुळे वणवा लागण्याचे प्रकार सातत्याने वाढत आहे. स्थानिक पातळीवरील दोन गटातील वैमनस्य, समाजकंटक आदींमार्फत जाणुनबुजून वणवे लागण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढले आहे. एखादा अपघात वगळता बहुसंख्य वणवे मानवांकडूनच जाणीवपूर्वक लावले जात आहेत. याचा त्रास बागायतदार, शेतकर्यांना मोठ्या बागायती, जंगली प्राणी, औषधी वनस्पती नष्ट होत आहे.
www.konkantoday.com