रत्नागिरीच्या भावना मोटघरे — वाघेला आज कौन बनेगा करोडपतीमध्ये

देशपातळीवरील कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमात रत्नागिरीतील बंदररोड येथील रहिवासी व नगर परिषद शाळा क्रमांक १५ दामले विद्यालय येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असलेल्या भावना मोटघरे-वाघेला यांना संधी मिळाली आहे. या शोमध्ये सहभागी होणार्‍या त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला आहेत.
या कार्यक्रमाचे प्रसारण दि. ३०, ३१ डिसेंबर रोजी रात्री ९ ते १०.३० वा. सोनी टीव्हीवर होणार आहे. यामध्ये त्यांनी आपल्या आयुष्यात आलेल्या अडचणीही व्यक्त केल्या आहेत. या शोमध्ये जाण्याचा त्यांनी का निर्धार केला? हे भाग बघा, असं आवाहन भावना प्रविण मोटघरे-वाघेला यांनी रत्नागिरीकरांना केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button