
सावर्डे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीला डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पदाधिकारी आक्रमक
राजकीयदृष्ट्या बलाढ्य समजल्या जाणार्या चिपळूण तालुक्यातील सावर्डे ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. मात्र एकत्र येणार्या राजकीय पक्षांकडून वंचित बहुजन आघाडीला डावलण्याचा प्रयत्न केला जात असल्याने पदाधिकारी आक्रमक झाले आहेत. या पक्षांनी विश्वासात घेतले नाही तर निवडणुकीत उमेदवार उभे करण्याचा इशारा युवक अध्यक्ष निलेश सावंत यांनी दिला आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष या निवडणुकीकडे लागले आहे.
konkantoday.com