रत्नागिरी शहरात घरगुती वादातून पतीने केला पत्नीवर प्राणघातक हल्ला ,पत्नी गंभीर जखमी
रत्नागिरी शहरात आज सायंकाळी माळनाका येथील धवल कॉम्प्लेक्समध्ये पती-पत्नी झालेल्या वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने वार केल्याने ती गंभीर जखमी झाल्याचा प्रकार घडला आहे सदर महिला माहेरी राहत होती तिचा पती महाड येथे कामाला असून काही दिवसापूर्वी रत्नागिरी नाचणे येथे राहण्यास आला होता तो आपल्या पत्नीला भेटण्यासाठी आज सायंकाळी तिच्या माहेरी म्हणजे धवल कॉम्प्लेस येथे आला होता पत्नी बाहेर गेल्याने तो तिची वाट पाहत उभा असताना बाजारातून परतलेल्या पत्नीबरोबर त्याची जोरदार बाचाबाची झाली त्यातून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर धारदार शस्त्राने हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेतपोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे
www.konkantoday.com