
चिपी विमानतळावर यशस्वी ट्रायल,पुढील वर्षांपासून रत्नागिरीतही विमानसेवा सुरू होणार -मंत्री उदय सामंत
सिंधुदुर्गातील चिपी म्हणजेच सिंधुदुर्ग विमानतळावर नऊ तारखेपासून विमानसेवा सुरु होत असल्याबद्दल सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आनंद व्यक्त केला आहे काल या विमानतळावर विमान उतरून व उड्डाण करून यशस्वी ट्रायल घेण्यात आली आता पुढील एका वर्षात रत्नागिरी विमानतळावरूनही विमानसेवा सुरू होईल असा विश्वास सामंत यांनी व्यक्त केला आहे त्यामुळे आता पुढील वर्षापासून रत्नागिरीकरही विमानाने प्रवास करू शकतील असा अंदाज आहे
www.konkantoday.com